म्यान झालत्या तलवारी,
तुफाण माजली होती गद्दारी ।
शिव-जन्मापुर्वी, देव नव्हता ऊरला हो मंदिरी ।।
पार पोळली, भाजली होती हो मराठी रयत,
उसन्या अहंकारात मात्र, फुत्कारात होती मुगल सल्तनत ।।
मिटवायला काफिरांचा बोकाळलेला हाहाकार,
करायला मराठी जन-माणसाचा उद्धार ।
कड्या-कपाऱ्यातुन सळसळला माझा राजा,
घेऊन धारोष्ण रक्ताची तलवार ।।
काफिरांना शिकवायला गानिमिकाव्यातून धडा,
भरून काढायला 'मराठी' अस्मितेला गेलेला तडा ।
भीष्मा-सारखा कणखर, राहिला माझा राजा खडा ।।
जुलमाच्या त्या हिरव्या जंगलात, भडकवायला वणवा,
सह्याद्रिच्या त्या ऎटदार कुशीत फडकवायला भगवा ।
जन्मला माझा राजा रांगडा ।।
दक्खनच्या शाह्यांची उडवायला रणधुमाळी,
वसवायला भगवंत अन भवानी-माता राऊळी ।
अवतरला माझा राजा रांगडा ।।
Ekdam mast... Use of words is superb... I loved it... Keep composing more like this on Shivaji Maharaja...
ReplyDeleteKhup chan lihlas vipin maharajan baddal....good going ...
ReplyDeleteKhup chan lihlas vipin maharajan baddal....good going ...
ReplyDeleteGood ..
ReplyDelete