वळून बघता 'इतिहासाची' तत्कालिनता,
वाटतं, खरंच काय होती त्यांची तल्लिनता ।
दिले जात एकमेकास सु-संस्काराचे धड़े,
तर मंगलसमयी वाजविले जात सनई-चौघड़े ॥
एकविल्या जात रोज 'पुराणातील' कथा,
पण, वाटून घेतल्या जात आनंद अन व्यथा ।
नव्हती ती काळीजे कापरी,
दुर्मिळच होती माणस 'भित्री' ॥
राखली जात ऐटीत दाढ़ी-मिशांची मिरास,
पण, चुग़ल-ख़ोरी व्हायची सर्रास ।
नव्हते तेव्हा स्पोकन ऑर पर्सनालिटी डेवलपमेंट,
वाड-वडिला कडूनच व्ह्यायची मेंदुचि- नॉरिशमेंट ॥
महान होती त्यांची सांगता,
नसायची लोकं आजच्या-सारखी पत्नीव्रता ।
जीवपाड़ जपले जात आप्तगण,
आजच्या-सारखे नव्हते तोड़ले जात बंध 'खाटकण' ॥
थोरा-मोठ्यांचे सल्ले गणले जात गोल्डन सोर्स,
नव्हते तेव्हा गूगल वा बिंग सारखे डाटा सोर्स ।
पराक्रम तर त्यांचे फार नयनलुब्ध,
नव्हते मोड़ीत दिलेले वचन आणि शब्द ॥
धन्यासाठी दिले जात जीव अगदी सहज,
भासते आज मात्र त्या विशाल 'ह्रदयांची' गरज ।।
Yes, all true... Society has changed its mindset and we are unable to find the causes for it which we could root out and get ourselves back on contemporary paths...
ReplyDelete