ओहोटीच्या शांत रात्री, निपचित उदर तु आकसून घावे ।
भरतीच्या त्या उर्मट दिवशी, आपसुकंच तु ते उधान घ्यावे ।।
अथांग महिमा तुझी सागरा,
गावयास ती शब्द उणे ।
पण, जाचक पाल लावुन तळाला, दावितोस सामर्थ्य जुणे ।।
केवळ अशक्य आहे !
'भरतीच्या त्या लाटांनी साऱ्या बोटींना अलगद उचलावं '
हे सांग जरा तु मनुष्या ।
त्रोटक प्रयत्नि सुद्धा, याच्या भव्य-दिव्य असतात अपेक्षा ।।
विराट साम्राज्य उभारण्यास, किती झटलास , किती खपलास तु ।
अन टिकवण्यास ती भव्यता,
किती तरी काठाचे चरण धूत आला आहेस कि तु ।।
विकोपाला क्रोध गेल्यास होतेच की तुझी मनमानी ।
धडा शिकवतोस मनुष्यास, आणुन चक्रीवादळ तर कधी त्सुनामी ।।
अथांग महिमा तुझी सागरा,
गावयास ती शब्द उणे ।
काळपटावरील मी एक ठिपका, झटतोय ! रहावी म्हणुन माझी पाऊलखुणे ।।
दिनांक - ११/०९/२०१२
I think time has came to publish your collection..kadakkk..hidden talent
ReplyDelete