Sunday, 25 January 2015

|| ऊठ मराठी ऊठ ||



ऊठ मराठी ऊठ, जागा हो आता तरी ।
फेक ते जोखड मानेवरचं लय झाली ही चाकरी ।।
शिवभूमितला या सुपुत्र तु, तुझं भाग्य किती थोर ।
काळ्या मातीचा या राजा तु, पण बनला आहेस तुझ्याच घरात तु एक चोर ।।

अरे लढवलेत किल्ले पूर्वजांनी, घोरपडीवरनं चढून ।
तु मात्र बनला आहेस हतबल हे सारं काही विसरून ।।
गोवऱ्या काय थापतोस असल्या कर्तव्यशुन्य जीवनाच्या ।
त्यापेक्षा ओव्या तरी 'गा', तुकोबा-ज्ञानोबारायांच्या अभंगाच्या ।।

अशी गौरवशाली  पार्श्वभुमी तुला, नाही त्यास दुसरा काही तोल ।
पण तुझ्याच मायदेशात तू का बरं गणला जावा कवडीमोल ?
बघ जरा कोण करतोय तुझ्या भाग्याची खोटी ।
ऊठ, आणि हासड त्यांची जीभ जे हिरवाताहेत तुझी रोजी-रोटी ।।

सुशिक्षित असुन सुद्धा कसाकाय राहू शकतोस तू बेकार ?
काहिही कर, पण जग तू सन्मानानं तुझे उरलेले दिवस चार ।।
ऊठ खरंच, तोड नाहीये या जगात तुझ्यातल्या या अचाट सामर्थ्याला ।
जरा 'बघू तरी दे', तुझ्या मनगट।तलं नेट या साऱ्या जगाला ।।   




No comments:

Post a Comment