मनातल्या भावना जेंव्हा कोणी समजायला तयार नसतं,
तेंव्हा हे मन कविता करायला लागतं ।
बेतलेले प्रसंग साध्या ओळी बनतात ।
तर,, पाणावलेल्या डोळ्यांचे क्षण मात्र अक्षरशः 'यमक ' बनतात ।।
एकत्र घालवलेला वेळ लिहायला कित्येक चारोळ्या देखील कमी पडतात ।
मग,, कोवळे अन नाजुक क्षण देखील अगदी अलंकारीकरित्या घडतात ।।
सुखद क्षणांची जागा, आल्हाददायी असा थंड वारा घेतो ।
तर,, दुखं सांगायला चक्रीवादळ आणि त्सुनामी देखील कमी पडतो ।।
त्याच्याशिवाय ती बनते, जसं भुंग्याविना फूल ।
अन,, एकांतच स्वरूप बनतं, जसं आईविना मूल ।।
भाषा किती गोड माझी, काय करू तिची सांगता ।
मन माझं शब्दात उतरवायला, म्हणुन करतो मी कविता ।।
दिनांक - २९/०४/२०१४