तपभर काळोखानंतर कुठे आत्ताच ऊजाडले होते,
नव्या प्रारंभाचे 'पण' मी आत्ता पहाटेच बांधले होते.
पुर्णत्वाचे उत्स्फुर्त क्षण मज आत्ताच जगावयाचे होते,
पण, विस्तवांचे लाल भडक ढग नभात, आत्ताच का, जमावयाचे होते ?
हवं तसं जगताच नाही आलं कधी !
जगणे हे फक्त विचारांच्या आराखड्यातच राहिले.
हवं तसं घरटं विनताच नाही आलं कधी,
विणलेले गवताचे तंतु अहंकारातंच विरले.
काय होतं माझ्या हातात तरी ?
सद्हेतुपुर्वक समजाविण्यापलिकडे.
कोणा-कोणाला सावरायचं तरी ?
सारंच वाहतं जेव्हा आवरण्यापलिकडे.
काळ प्रतारणा करून सहज हसला,
मी मात्र, निमग्नपने वादळांचे 'हलाहल' प्यायलो.
आल्हाददायी वेळ निमुटपणे रुसुन बसला,
मी मात्र, नव्या जोमाने त्याला विनवायला, काथ्याकुट करायला उठलो.
No comments:
Post a Comment