चौफेर वारू उधळनाऱ्या अवघ्या मराठीजणांचा स्वाभिमान,
चार शतकांपरी आजही राजे तुम्हीच आमुचा अभिमान.
तुम्हीच बोवलेल्या निर्भिडतेमुळे,
लाभतोय माय मराठीला आज सन्मान.
कित्येक राजे मिरवुनि गेले आजवर,
तरी शिवराय तुम्हीच आमुचे प्रेरणास्थान.
पुन्हा शिवकालीन मावळा नाही होता येत, याचा किंचित वाटतो खेद,
पण, पदोपदी स्मरते तुमचीच शिकवण 'साम-दाम अन दंड-भेद'.
तुम्ही उभारलेल्या हिंदवी स्वराज्याची आज फक्त येतेय कीव,
पुन्हा एकदा मावळा व्हावसं वाटतंय, ऒवाळून टाकायला जीव.
राजे, मराठी मुलखाच्या काल-पटावरील कधीच न मिटणारा 'भगवा ठसा' आहात तुम्ही,
माझ्या मराठी मुलखाच्या, मराठी विचारांत, आजही जिवंत आहात तुम्ही.
काफिरांचे सदा परतुनी लाविले तुम्हीच राजे लोट,
सह्याद्रिच्या त्या मराठी इभ्रतेचे तुम्हीच राखिले गड-कोट.
तुम्हीच दिलेल्या सामर्थ्यानं खिळवतोय मी आज, साऱ्या जगाशी नजरा,
नतमस्तक होऊन विनवणी राजे, घ्यावा या मावळ्याचा मुजरा.