Sunday, 10 May 2015

|| श्वेतकमल ||


किती नाजुक तू , किती साजुक तू,
देखणी तू अगदी श्वेतकमला सारखी
अन, किती कोमल तू , वसंतातल्या पिसारा फुलवलेल्या मोरणीसारखी ।।

गालावर तुझ्या दिसतो 'कापसाचा' मळा,
'ऒठ', कि आहेत रसाळ मधाचे पिंप ? प्रश्न पडतो हा वेगळा !
अल्लड बागडणं ते तुझं नवजात शिशुसारखं,
अन, ते हसणं तुझं मोत्यांच्या वर्षावासारखं ।।

केषांभराचं ते रेशमी जाळं,
वाटतं ! 'जावं त्यात गुरफटून एखाद्या भरकटलेल्या वाटसरूसारखं' |
तुझी सोबत म्हणजे, हर्षाचा एक परमोच्चबिंदूच,
पणं, तुझ्या वेंधळेपणात देखील दडलेला असतो माझा उत्कर्षबिंदू ।।

'चकोर' मला बनायचं होतं, तुझ्या सहवासाचं चांदणं पिण्यासाठी
सोबत मला द्यायची होती, तुला पावलो-पावली धीर देण्यासाठी ।।
असो ! 'तुला मिळवणं' हे तर एक 'खुळं' स्वप्न आहे,
मात्र, तुला कसं चिरकाल हसत ठेवता येईल, या विचारांतचं माझं मन 'मग्न' आहे ।।